शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine : रिसर्सः लस घेतलेल्या लोकांकडून होऊ शकतो 'डेल्टा'चा प्रसार; पण 'या' व्यक्तींना धोका कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 4:12 PM

1 / 15
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा कहर सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांचा बळी गेला आहे. कित्येक देशामध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 15
जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असले तरी रुग्णांची वाढती संख्या ही चिंता वाढवणारी आहे. कडक निर्बंध लागून करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
3 / 15
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 246,395,187 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जगभरातील कोरोना बळींची संख्या 49 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत 4,998,731 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
4 / 15
जगातील सर्वच देशात वेगाने लसीकरणाची मोहीम सुरू आहे. याच दरम्यान रिसर्चमधून एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना लस घेतलेल्या लोकांकडून वेगाने डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार होत असल्याची आता माहिती मिळत आहे.
5 / 15
गुरुवारी एका ब्रिटिश अभ्यासात कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा लसीकरण केलेल्या लोकांपासून त्यांच्या संपर्कांमध्ये असलेल्या लोकांमध्ये सहजपणे वेगाने पसरू शकतो असं म्हटलं आहे. तसेच वर्षभराच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
6 / 15
लसीकरण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांनी देखील लस घेतली असेल तर कोरोना डेल्टा संक्रमणाचा धोका कमी असणार आहे. इंपीरियल कॉलेज लंडनने केलेल्या संशोधनातून हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
7 / 15
संशोधकांनी कोरोनाचा गंभीर धोका कमी करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे लस आहे. तसेच बुस्टर डोस घेण्याची देखील गरज आहे असं म्हटलं आहे. ज्या लोकांनी लस घेतली आहे ते लोक लवकर बरे झाले आहे.
8 / 15
ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांना मोठा धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. डॉ. अनिका सिंगनायगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमित असलेल्या लोकांचे अनेकदा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
9 / 15
लस घेतलेल्या लोकांना कोरोनाचा धोका असून ते आपल्या घरामध्ये कोरोनाचा प्रसार करू शकतात, असं देखील म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच जगभरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. लसीकरण जास्त असलेल्या देशात असं होत आहे.
10 / 15
रिसर्चमध्ये 621 लोकांचा समावेश होता. लसीकरण केलेल्या लोकांपैकी 25 टक्के लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर लसीकरणाशिवाय लोकांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 38 टक्के लोकांना संसर्ग झाला आहे.
11 / 15
लसीकरण झालेल्यांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे होती, तर ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांच्या संपर्कात आलेल्या संक्रमित लोकांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 15
कोरोना लस गंभीर आजार कमी करते आणि रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी देखील काम करते. पण, त्याचा कोरोना व्यतिरिक्त इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूदरावरही परिणाम होतो का? यासंदर्भात नवं संशोधन आता समोर आलं आहे.
13 / 15
लस घेतलेल्या लोकांमध्ये इतर आजारामुंळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लस न घेतलेल्यांच्या तुलनेत कमी होतं. Kaiser Permanente यांनी केलेला हा रिसर्च अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मृत्यू दर साप्ताहिक अहवालात करण्यात आली आहे.
14 / 15
ज्यांना कोरोना लस मिळाली नाही त्यांच्यामध्ये 11.1 मृत्यू दर नोंदवला गेला होता. ज्यांना मॉडर्ना लस मिळाली, त्यांच्यामध्ये पहिल्या डोस नंतर एक हजार लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण 3.7 आणि दुसऱ्या नंतर 3.4 मृत्यू होते.
15 / 15
ज्यांना लस मिळाली नाही त्यांचा मृत्यू दर 1000 लोकांपैकी 11.1 होता. त्याचवेळी जॉन्सन अँड जॉन्सन लस घेतलेल्या प्रति 1,000 लोकांमध्ये 8.4 मृत्यू झाले. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस