Corona Vaccine : Covishield, Covaxinला लवकरच बाजारात विक्रीसाठी मिळणार मंजुरी; जाणून घ्या किती असणार किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 12:12 IST
1 / 14देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,86,384 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 573 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 / 14कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख 90 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. 3 / 14देशातील Covishield आणि Covaxin या अँटी-कोविड-19 लसी लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसींना लवकरच त्यांच्या विक्रीसाठी भारताच्या औषध नियामकाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. 4 / 14कोरोना लसीची किंमत प्रति डोस 275 रुपये असण्याची शक्यता आहे आणि 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाऊ शकतात. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला लसींना आर्थिकदृष्ट्या कमी किंमतीत बनवण्यासाठी लसींच्या किंमती मर्यादित करण्याच्या दिशेनं काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.5 / 14खासगी रुग्णालयांमध्ये कोवॅक्सिनची (Covaxin) किंमत प्रति डोस 1,200 रुपये आणि कोविशील्डची (Covisheeld) किंमत प्रति डोस 780 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किंमतींमध्ये 150 रुपये सेवा शुल्क समाविष्ट आहे. 6 / 14दोन्ही लसी केवळ देशात आपत्कालीन वापरासाठी अधिकृत आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या COVID-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने, 19 जानेवारी रोजी, Covishield आणि Covaxin ची काही अटींसह प्रौढांसाठी नियमितपणे विक्री करण्यास मान्यता देण्याची शिफारस केली होती.7 / 14एका अधिकृत सूत्राने सांगितले की नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंगला ते स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले आहे. लसीची किंमत प्रति डोस 275 रुपये आणि 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्कासह मर्यादित केली जाण्याची शक्यता आहे. 8 / 14सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) प्रकाश कुमार सिंग यांनी 25 ऑक्टोबर रोजी भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांना कोविडशील्ड लस नियमित बाजारात लॉन्च करण्यासाठी मंजूरी मागणारा अर्ज सादर केला होता.9 / 14काही आठवड्यांपूर्वी भारत बायोटेकचे पूर्णवेळ संचालक व्ही. कृष्ण मोहन यांनी कोवॅक्सिनला नियमित बाजारात आणण्याची मागणी केली आणि प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह, रासायनिक, उत्पादन आणि उत्पादनातील नियंत्रणाची संपूर्ण माहिती सादर केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 14देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्येही काही लक्षणं दिसून येत आहेत.11 / 14जग आता पूर्वीपेक्षा खूप मजबूत स्थितीत असून कोरोनाच्या या व्हेरिएंटशी लढण्यासाठी सज्ज आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस मिळाली आहे. त्यामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे.12 / 14कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांमध्ये दिसणारी लक्षणंही सौम्य आहेत. कोविडचे वेळोवेळी येणारे नवीन प्रकार पाहता, कोरोना लक्षणांच्या प्रोफाइलमध्येही बदल करण्यात आले आहेत.13 / 14न्यूजजीपीमधील प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण 2020 मध्ये आलेल्या अल्फा व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर त्याची खोकला, ताप आणि वास येणं कमी होणं अशी 3 लक्षणं खूप सामान्य होती.14 / 14विशेषतः ही लक्षणं पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये दिसून आली आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याने सध्या परिस्थिती वाईट झाली आहे. कोरोनाच्या तिसर्या प्रकाराबद्दल पाहिलं तर डेल्टा व्हेरिएंटचा ट्रेंड पुढे नेत असल्याचं दिसतं.