कर्नाटक विधानसभा इमारतीला 60 वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 14:57 IST2017-10-25T14:54:00+5:302017-10-25T14:57:32+5:30

कर्नाटक विधानसभेच्या ऐतिहासिक इमारतीला बुधवारी 60 वर्ष पूर्ण झाली.

विधानसभेच्या इमारतीला साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विधानसभा इमारतीला खाल विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

पाच हजार कामगारांनी काम करून पाच वर्षात ही ऐतिहासिक वास्तू तयार केली आहे. 1951 ते 1956 अशा पाच वर्षात ही वास्तू तयार करण्यात आली.

विधानसभेची ही वास्तू बांधायला 1.84 कोटी इतका खर्च झाला असून एकुण 60 एकर जागेत ही इमारत आहे.