चीनच्या रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री?; 'या' राज्यातील 2 मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखीच लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:00 PM2023-11-30T17:00:00+5:302023-11-30T17:08:18+5:30

चीनमध्ये पसरलेल्या या आजाराबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने अलर्ट जारी केल्यानंतर सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

चीनमधील लहान मुलांमध्ये एक रहस्यमयी आजार पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमध्ये चीनमध्ये पसरलेल्या या आजाराबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने अलर्ट जारी केल्यानंतर सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये दोन मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखीच लक्षणं आढळून आली आहेत. या संदर्भात मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण पुढे येत आहेत.

कोरोनानंतर आता देशातील जवळपास सर्व राज्ये चीनमधून उद्भवलेल्या या आजाराबाबत सतर्क आहेत. उत्तराखंडमधील आरोग्य विभागाने चीनमध्ये मायक्रो प्लाझ्मा न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा प्रवाहाच्या प्रसाराबाबत दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.

यासंदर्भात अलर्टही जारी करण्यात आला आहे. आता अलर्टनंतर बागेश्वर जिल्ह्यातील दोन मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखी लक्षणे दिसून आली आहेत. दोघांचे नमुने तपासणीसाठी सुशीला तिवारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून रिपोर्टची वाट पाहत आहेत.

बुधवारी दोन मुलांना बागेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. इन्फ्लूएंझा सारख्या लक्षणांसह श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी नमुने सुशीला तिवारी मेडिकल कॉलेज, हल्दवणी येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.

तपासाचा रिपोर्ट चार ते पाच दिवसांत येईल. रिपोर्ट समोर आल्यानंतरच हा व्हायरस तोच आहे की नाही याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. याबाबत सध्या आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसून येत आहे.

या आजाराच्या पाचव्या टप्प्यात ऑक्सिजन आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत राज्यभरातील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनची पूर्ण मात्रा ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

व्हेंटिलेटर आणि इतर वस्तू तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्डही तयार करण्यात आले आहेत. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने उत्तराखंडच्या सर्व जिल्हा दंडाधिकारी आणि सीएमओना अलर्ट मोडवर ठेवले आहे.

आरोग्य सचिव आणि राजेश कुमार यांनी आदेश जारी करताना सर्वांनी या आजाराबाबत पूर्णपणे सतर्क राहावे, रुग्णालयांमध्ये पूर्ण व्यवस्था करावी आणि कोणत्याही गोष्टीबाबत निष्काळजीपणा करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.