बाली यात्रा महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 15:51 IST2019-11-13T15:39:17+5:302019-11-13T15:51:15+5:30

ओडिसामधील प्रसिद्ध बाली यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक अशा या बाली यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.

काल विधानसभा अध्यक्ष सूर्य नारायण पात्र यांनी बाली यात्रेचे उद्घाटन केले. 19 नोव्हेंबरपर्यंत ही बाली यात्रा असणार आहे.

याशिवाय, यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या यात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राजदूत सिद्धार्थो रेजा सूर्यदीपुरो उपस्थित राहणार आहेत.

बाली यात्रेत यंदा खास बोटिंगची व्यवस्था केली आहे. या बोटिंगचा आनंद यात्रेकरूंना घेता येणार आहे.

बाली यात्रेसाठी सरकारकडून सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

टॅग्स :ओदिशाOdisha