Arun Jaitley Death : विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री; जेटलींचा थक्क करणारा राजकीय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 02:09 PM2019-08-24T14:09:35+5:302019-08-24T14:22:05+5:30

नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.

महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली मध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी झाला.

1957 मध्ये शाळेत प्रवेश. येथेच जेटलींच्या विचारसरणीला व राजकीय विचारांना दिशा मिळाली. त्यानंतर 1969 मध्ये व्यावसायिक कारकीर्दीची पायाभरणी करणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतली. फर्डा वक्ता व विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष म्हणून नाव कमावले.

1974 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दिल्ली विद्यापीठात अभाविपची उमेदवारी घेऊन विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी निवड. त्यानंतर 1975 मध्ये आणीबाणीविरुद्ध बंड पुकारल्याने 19 महिन्यांची जेल. कारावासात विविध व्यक्तींच्या सहवासाने व्यक्तिमत्त्वाला उभारी मिळाली.

1977 मध्ये आणीबाणीच्या असंतोषातून लढल्या गेलेल्या 1977 च्या निवडणुकीत देशभरात प्रचार केला. लोकतांत्रिक युवा मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक पदावरून जनता पार्टीसाठी धडाडीने बाजू मांडली.

1980 मध्ये जेटलींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तर 1991 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य झाले. तसेच संयुक्त राष्ट्रांत भारतातून गेलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य झाले.

1999 मध्ये दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना अध्यक्षपदी निवड.

2000 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात विधि, न्याय व कंपनी व्यवहार मंत्रालयाची धुरा व 2001 मध्ये जहाज बांधणी मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार. बंदरांच्या आधुनिकीकरणावर लक्ष

2002 मध्ये अरूण जेटली भाजप सरचिटणीस झाले. तसेच 2003 मध्ये मेक्सिकोत जागतिक व्यापार संघटनेच्या चर्चेसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व.

2006 मध्ये गुजरातमधून राज्यसभेवर फेरनिवड. 3 जून 2009 ते 26 मे 2014 या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.

13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली.

26 मे 1014 ते 14 मे 2018 या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले.