शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Anna Hazare hunger strike: ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 6:14 AM

1 / 6
नवी दिल्ली : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी गाजला. रामलीला मैदानावर हजारो शेतक-यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
2 / 6
डॉक्टरांच्या पथकाने दुपारी अण्णांची प्रकृती तपासली. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही वाढला आहे. तरीही उपोषणावर अण्णा ठाम आहेत.
3 / 6
गेल्या आंदोलनाच्या तुलनेत यंदा गर्दी कमी असली तरी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसत होता. मैदानात एका बाजूला जेवणाची व्यवस्था होती.
4 / 6
पंजाब, हरयाणातून येणा-या शेतक-यांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या बसेस अडवण्यात येत आहेत. आंदोलन चिरडण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, अशी टीका अण्णांनी केली आहे.
5 / 6
आंदोलन हा लोकशाहीतील अधिकार आहे. जनतेला न्याय मिळत नाही, तेव्हा आंदोलन होते. अहिंसक मार्गाने असलेले हे आंदोलन कुठलाही पक्ष, वा व्यक्तीच्या विरोधात नाही, देशाच्या भल्यासाठी आहे. सरकारशी बोलणी सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
6 / 6
शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला आहे.
टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNew Delhiनवी दिल्ली