शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:48 IST

1 / 8
एअर इंडियाच्या विमान अपघाताने देशवासियांना हादरा बसला आहे. अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले विमान अवघ्या तीन मिनिटांतच विमानतळ परिसरात क्रॅश झाले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. परंतू, हे विमान रहिवासी भागावर कोसळल्याने अपघाताची व्याप्ती खूप मोठी असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 8
एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले ती इमारत बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची होती. दुपारची वेळ असल्याने सर्व इंटर्न डॉक्टर जेवणासाठी हॉस्टेलवर परतले होते. ते जेवत असतानाच हे विमान त्यांच्या इमारतीवर कोसळले आहे.
3 / 8
या अपघातात विमानातील प्रवाशांबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसली तरी या हॉस्टेलमध्ये असलेले किमान २० इंटर्न डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हॉस्टेलच्या मेसच्या इमारतीवर हे विमान पहिल्यांदा आदळले होते. यावेळी बहुतांश डॉक्टर जेवण करत होते. मेसमध्ये जेवणाची ताटे तशीच टेबलवर असलेली दिसत आहेत. डॉक्टरांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
4 / 8
या क़ॉलेजमध्ये रमिला नावाच्या महिलेचा मुलगाही शिकत होता. त्याला तिने फोन करून परिस्थिती विचारली, तेव्हा त्याने आपण सुखरूप आहे, विमान आदळताच आपण दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचे त्याने सांगितल्याचे रमिला यांनी सांगितले आहे. तसेच त्याला काही प्रमाणात दुखापत झाल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
5 / 8
या अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत.
6 / 8
विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर भागात कोसळले.
7 / 8
विमानाचा पाठीमागचा भाग खाली झुकल्याने तो झाडांवर आणि नंतर इमारतीच्या छतावर आदळला. यामुळे विमानाला आग लागली. अद्याप ब्लॅक बॉक्स मिळालला नाहीय. त्यावरून नेमका अपघात कसा झाला आणि त्याचे कारण काय याची माहिती मिळणार आहे.
8 / 8
विमान कोसळताच भलेमोठे आगीचे आणि धुराचे लोळ उठले, एवढे की अहमदाबादमध्ये दोन किमी वरून ते दिसत होते. ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. इमारतींच्या परिसरातील वाहने जळून खाक झाली आहेत. रहिवासी भागात हे विमान कोसळल्याने मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाGujaratगुजरातahmedabadअहमदाबाद