तीन दशकांनंतर भगवं वस्त्र परिधान करून मोदींची साधना, कारण आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 21:20 IST2019-05-20T21:18:10+5:302019-05-20T21:20:51+5:30

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. मोदींनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विशेष पूजा केली.
यानंतर मोदी केदारनाथमध्ये ध्यान केलं आहे. इथे त्यांनी रात्रभर गुहेत ध्यानधारणाही केली.
ज्या ठिकाणी मोदींनी ध्यानधारणा केली ती गुहा केदारनाथ मंदिराच्या डावीकडे डोंगरात तयार करण्यात आली आहे.
आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या गुहेत राहून आल्यामुळे या गुहेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे
मोदी राहून आलेल्या गुहेविषयी लोकांमध्ये उत्सुकताही वाढली.
महत्त्वाची बाब म्हणजे ही गुहा तुम्ही सुद्धा बुक करू शकता आणि इथे जाऊन ध्यानधारणा करू शकता.