मधुबनीनंतर आता चित्रांनी रंगणार दरभंगा स्टेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 15:25 IST2018-02-05T15:21:14+5:302018-02-05T15:25:49+5:30

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्टेशन आता पूर्णपणे मधुबनी पेंटिंग्जनी रंगले आहे.

एके काळी सर्व स्टेशनांप्रमाणे रूक्ष दिसणाºया मधुबनीला रंगवले आणि मधुबनीच्या चित्रकारांनी. तेही एक पैसा न घेता. आता दरभंगा रेल्वे स्टेशनही असेच रंगणार आहे.

बिहारमधील रेल्वे स्टेशन आणि तेथील प्रवास म्हणताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. अस्वच्छ स्टेशन्स आणि सरसकट फसवणूक यासाठी बिहारची अनेक रेल्वे स्टेशन ओळखली जातात.

रेल्वेने त्याला रंग आणि ब्रशन इतकेच साहित्य दिले. बाकी सारे या चित्रकारांनी स्वत:हून केले. म्हणजे हे कलाकारांचे श्रमदानच म्हणायला हवे. यात अनेक महिला कलाकारही सहभागी होत्या.