शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

४५०० वंदे भारत ट्रेन आणणार, राजधानी-शताब्दीचे महत्त्व कमी होणार; रेल्वेचे Vision 2047 आले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 14:08 IST

1 / 12
Indian Railway Vision 2047: भारतीय रेल्वे पायाभूत सुविधा, रेल्वेचे जाळे, ट्रेनचे प्रकार, प्रवासी सुविधा यासंदर्भात अगदी वेगाने काम करत आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळावा यासाठी भारतीय रेल्वे देशभरात विविध ट्रेन चालवते. राजधानी, शताब्दीनंतर आता वंदे भारत ट्रेनचे युग भारतीय रेल्वेत आले आहे. प्रीमियम श्रेणीमध्ये राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे.
2 / 12
भारतीय रेल्वेची यंत्रणा हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. आताच्या घडीला भारतीय रेल्वेत अमूलाग्र बदल होताना पाहायला मिळत आहे. डिडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरपासून ते २० कोचच्या वंदे भारत ट्रेनपर्यंत भारतीय रेल्वेने अनेक मैलाचे दगड गाठले आहेत. हायस्पीड पेसेंजर ट्रेनपासून, ऑक्सिजन ते वेळेत शेतमालाच्या वाहतुकीपर्यंत अनेक मोठ्या गोष्टी भारतीय रेल्वेने साध्य करून दाखवल्या आहेत.
3 / 12
भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी वंदे भारत ही केवळ एक ट्रेन नाही तर ती आत्मनिर्भर भारताचे प्रतीक बनली आहे. भारतीय रेल्वेच्या सर्वांत लोकप्रिय असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनने मोठा इतिहास घडवला आहे. गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. अल्पावधीत प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद या वंदे भारत ट्रेनला लाभला आहे.
4 / 12
यानंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते कोलकाता ते कामाख्या या दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली आहे. ही ट्रेन सुरू होताच प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद या ट्रेनला लाभला आहे. पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे.
5 / 12
यातच भारतीय रेल्वेने व्हिजन २०४७ मांडले आहे. भारतीय रेल्वेसाठी वंदे भारत ट्रेनचे युग सुरू झाले आहे. भारतीय रेल्वेने व्हिजन डॉक्युमेंट २०४७ मध्ये ४ हजार ५०० चेअर कार वंदे भारत आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या नवीनतम कोच उत्पादन कार्यक्रमात (२०२५-२९) १४० वंदे भारत आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे.
6 / 12
सन २०३१ पर्यंत उत्पादन पाच पटीने वाढवून ८०० करण्याचे लक्ष्य आहे. रेल्वे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सेमी-हाय स्पीड आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या चेअर वंदे भारत ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन हळूहळू रेल्वेच्या प्रीमियम राजधानी एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेस ट्रेनची जागा घेणार आहेत. भविष्यातील प्रवास हाय-टेक आणि आरामदायी बनवण्यासाठी रेल्वे बोर्डाने आपला सर्वांत महत्त्वाकांक्षी उत्पादन कार्यक्रम जारी केला आहे.
7 / 12
रेल्वे बोर्डाच्या या योजनेनुसार, देशभरात २०२९ पर्यंत वंदे भारत (चेअर कार), वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि अमृत भारत ट्रेनचे जाळे पसरवले जाईल. यासाठी २०२५-२६ पर्यंत १७ नवीन ट्रेन (१६ कोचसह) प्रवाशांच्या सेवेत येतील. या वर्षी नऊ वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केल्या जातील. २०२६-२७ पर्यंत १८-१९ नवीन वंदे भारत ट्रेन धावतील. याशिवाय, २० कोच असलेल्या दोन स्लीपर ट्रेन सुरू केल्या जातील.
8 / 12
सन २०२७-२८ मध्ये ७० वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जातील. ज्यामुळे विक्रमी उत्पादन होईल. तर यावर्षी २४ नवीन स्लीपर ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात जोडल्या जातील. २०२८-२९ मध्ये स्लीपर ट्रेनचा बोलबाला असेल. यावर्षी २० कोच असलेल्या २४ स्लीपर ट्रेन सेवेत येतील. रेल्वेने दरवर्षी ९९९७ कोच तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०२९ पासून हे उत्पादन पाच पटीने वाढवले ​​जाईल, जेणेकरून व्हिजन २०४७ चे लक्ष्य साध्य करता येईल.
9 / 12
भारतीय रेल्वेत आताच्या घडीला ५४ राजधानी एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आहेत. राजधानी एक्स्प्रेस ट्रेन लांब पल्ल्याच्या रेल्वे रेल्वेच्या सर्वात प्रीमियम ट्रेनपैकी एक आहे. दि. १७ जानेवारी रोजी रेल्वेने गुवाहाटी-कोलकाता दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली. या वर्षी स्लीपर ट्रेनची संख्या ९ होण्याची अपेक्षा आहे. आकर्षक इंटीरियर डिझाइन आणि हायटेक प्रवासासह वंदे स्लीपर ट्रेन राजधानीची जागा घेणार आहेत.
10 / 12
तर दुसरीकडे भारतीय रेल्वेच्या ताफ्यात ५६ शताब्दी एक्सप्रेस ट्रेन आहेत. रेल्वेने आतापर्यंत १६४ चेअर कार वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. रेल्वे दोन श्रेणींमध्ये वंदे भारत ट्रेन सेवा देते. मिनी चेअर कार वंदे भारत ट्रेन जी ८ कोचसह धावते, ती कमी गर्दीच्या आणि कमी अंतराच्या मार्गांवर धावते. जास्त मागणी असलेल्या आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मानक १६ ट्रेनच्या आणि विस्तारित २० डब्यांच्या चेअर कार वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. चेअर कार वंदे भारत ट्रेन भविष्यात हळूहळू शताब्दी एक्सप्रेस ट्रेनची जागा घेतील.
11 / 12
दरम्यान, आवाज नाही, धूर नाही. भारतात एक अशी ट्रेन धावणार आहे जी वेगाच्या बाबतीत वंदे भारत ट्रेनला टक्कर देईल आणि वैशिष्ट्यांमध्ये शताब्दी एक्सप्रेससारख्या प्रीमियम ट्रेनला टक्कर देईल. परंतु या ट्रेनच्या तिकिटाने सर्वांना आश्चर्यचकित करणारे ठरणार आहे. १५० किमी प्रति तास वेगाने २६०० प्रवाशांना नेणारी ही ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.
12 / 12
भारतीय रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत हायड्रोजनवर चालणारी देशातील पहिली ट्रेन चालवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. हायड्रोजनवर चालणारी ही ट्रेन सर्वांत शक्तिशाली आणि सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असणार आहे. या ट्रेनमध्ये ८ ते १० प्रवासी कोच असणार आहेत. अलीकडेच रेल्वेने या इंजिनची यशस्वी चाचणी केली. हे इंजिन चेन्नईतील कारखान्यात तयार करण्यात आले आहे. ही रेल्वे जगातील सर्वात शक्तिशाली असणार आहे. अशाप्रकारच्या ३५ ट्रेन बनविण्यात येणार आहेत. ज्या देशातील विविध भागात सुरु केल्या जाणार आहेत.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसTravel Tipsट्रॅव्हल टिप्सrailwayरेल्वेpassengerप्रवासीRailway Passengerरेल्वे प्रवासीCentral Governmentकेंद्र सरकार