नाशिक- तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लीम महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:11 IST2018-03-31T22:14:49+5:302018-04-01T01:11:38+5:30

केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेले तीन तलाकविरोधी विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी शरियत बचाव कृती समितीतर्फे शनिवारी (दि़३१) दुपारी हजारो मुस्लीम महिलांनी शहरातून मूक मोर्चा काढून विधेयकाच्या विरोधातील एल्गार पुकारला़