'देव घ्या, देवपण घ्या', नाशिकमध्ये मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 17:08 IST2017-09-05T17:00:23+5:302017-09-05T17:08:57+5:30

नाशिकमध्ये मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आज राज्यभरात उत्साहात गणेश विसर्जन सुरु असून, भाविक आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देत आहेत
नाशिकमध्ये मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिकमध्ये नदीपत्रातील प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जित मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
नाशिकमध्ये मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिकमध्ये 1997 रोजी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्वप्रथम विसर्जित मूर्ती दान घेऊन नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी चळवळ चालविली होती
नाशिकमध्ये मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
'देव घ्या, देवपण घ्या' या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून नाशिक महापालिका आणि अन्य सेवाभावी संस्थांनी सुमारे 50 हजार मूर्तींचे संकलन केले आहे
नाशिकमध्ये मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गतवर्षी 2 लाख 39 हजार मूर्ती आणि 169 टन निर्माल्य संकलनाचा उच्चांक होता. हा विक्रम यंदा मोडण्याची शक्यता आहे.