तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 09:22 PM2019-08-19T21:22:19+5:302019-08-19T21:32:22+5:30

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये तिस-या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकराजाची मोठी यात्रा भरली आहे. (सर्व छायाचित्रे : राजू ठाकरे)

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये बम बम भोलेचा गजर करत हजारो अबालवृद्धांनी ब्रह्मगिरीच्या पर्वताला प्रदक्षिणा घातली.

हिरवाईने नटलेली त्र्यंबकनगरी भोले भक्तांचा उत्साह अधिक वाढवित आहे.

ज्येष्ठ भोले भक्त आपल्या अंगाखांद्यावर भावी पिढीला बसवून प्रदक्षिणा घालताना दिसून आले.

मुखी बम बम भोलेचा गजर...कपाळावर भस्म अन हातात डमरू घेत प्रदक्षिणाफेरीत सहभागी झालेल्या तरुणांचा उत्साह शिगेला पोहचलेला आहे.

बम बम भोलेचा गजर करत तरुणाई मोठ्या उत्साहानं त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाली आहे.

महामंडळाच्या जादा बसेसद्वारे नाशिक शहरातून हजारोंच्या संख्येने भाविक रविवारी सायंकाळपासूनच त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर खंबाळेपासून एकेरी वाहतूक सुरू आहे. या संपूर्ण रस्त्यावर भाविकांची गर्दी लोटली होती.