शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat Case : अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ आला समोर! अल्पवयीन मुलीवर केबल टेस्टरने उपचार, कारनामे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:49 IST

1 / 9
Ashok Kharat Case : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. खरात याने त्याच्याच केबीनमध्ये अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा नीरज जाधव यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
2 / 9
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांना शंभर व्हिडीओ मिळाल्याचे समोर आले आहे. यामध्ये अशोक खरात याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. महिलांचे शोषण करण्यासाठी तो काय मोडस ऑपरेंडी वापरायचा, कसं त्यांना भुलवायचा याची बरीच माहिती समोर आली होती.
3 / 9
अशोक खरात हा महिलांवर, मुलींवर उपचाराचा दावा करणाऱ्या या भोंदूबाबाने ‘केबल टेस्टर’ आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून भोंदूगिरी केल्याचे उघड झाले.
4 / 9
अशोक खरात याने अल्पवयीन मुलींवर अघोरी उपचार केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तो ‘केबल टेस्टर’ आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून भोंदूगिरी करत असल्याचं त्यातून उघड झाले आहे.
5 / 9
भोंदू अशोक खरातने मुलीच्या पोटावर ‘इंटरनेट केबल टूल’ने उपचाराचा बनाव केला. त्या मुलीच्या पोटावर स्पर्श करत अघोरी उपचार करत असल्याचं भासवले. या व्हिडीओने राज्यात खळबळ उडाली आहे.
6 / 9
या प्रकरणाचे व्हिडीओ खरात याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव याने बाहेर काढले आहेत. आता पोलिसांनी या नीरज जाधव याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी नीरज जाधव याला संरक्षणही दिले आहे.
7 / 9
नीरज जाधव याच्याकडून पोलिसांना मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. अशोक खरात याचे कोणासोबत जवळचे संबंध होते? त्याला कोण मदत करत होते? याबाबत सर्व माहिती समोर येणार आहेत. तसेच राजकीय वर्तुळातील कोणत्या नेत्याचा खरात याला पाठिंबा आहे, आणखी काही नवीन माहिती मिळवण्याचा पोलिस प्रयत्न करणार आहेत.
8 / 9
पोलिसांनी आधी अशोक खरात याच्या निवासस्थानासह ऑफिस, फार्म हाऊसची झाडाझडती घेतली. आता एसआयटीने तांत्रिक पुराव्याची तपासणी सुरू केली असून डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपास करण्यात येत आहे. अशोक खरात याच्या अनेक ठिकाणी मालमत्ता सापडल्या आहेत, त्याने पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी, ओझर परिसरात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.
9 / 9
दरम्यान, या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर या अशोक खरातच्या संस्थेवर सदस्य होत्या, यामुळे त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू होते.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीViral Videoव्हायरल व्हिडिओ