मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबारमधील घोडेबाजाराची केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 15:30 IST2017-12-08T15:15:13+5:302017-12-08T15:30:21+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील घोडेबाजाराची (शुक्रवारी) पाहणी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अश्व संग्रहालयाचेही लवकरच भूमिपूजन होणार असल्याचेही सांगितले.

सारंगखेडा येथे दत्त जयंतीला देशातील अग्रगण्य घोडेबाजार भरतो.

देशपरदेशातून सुमारे 400 ते 600 प्रकाराच्या जातीचे घोडे येथे विक्रीसाठी येतात.