शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'अख्ख्या गर्दीत महाराष्ट्राचा कोहिनूर', नेटीझन्स म्हणाले रितेश तूही सहभागी हो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 6:23 PM

1 / 9
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर या मार्गावर भारत जोडो पदयात्रा निघाली आहे. राहुल गांधी या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहेत. त्यांच्यासोबत भारत जोडोमध्ये पायी चालणं राज्यातील अनेक नेते मंडळींना शक्य होत नाही.
2 / 9
प्रकृतीमुळं अनेकांनी राहुल गांधी यांच्यासोबत चालण्याचं टाळलं आहे. परंतू यात राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून युवक मोठ्या उत्साहाने चालत आहेत. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी या यात्रेचं जल्लोषात स्वागत झालं.
3 / 9
काँग्रसेच्या दिग्गज नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं. तेव्हापासून ते महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा दाखल झाल्यापासून राहुल गांधींसोबत सतत चालत आहेत.
4 / 9
मी शेतकरी आहे चालताना माझे पाय दुखत नाहीत असेही ते म्हणाले. दिवंगत राजीव सातव यांनी आम्ही सगळेजण मिस करत असल्याचे पटोले म्हणाले. यावेळी, राहुल गांधींनाही राजीव सातव यांची उणीव भासल्याचे दिसून आले.
5 / 9
भारत जोडो पदयात्रेत सतेज पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून भगवे फेटे घालून हजारो जण पदयात्रेत सहभागी झाले आहेत. कोल्हापूरची ओळख असलेल्या कुस्तीतील मल्लसुद्धा या यात्रेत सहभागी झाले आहेत.
6 / 9
या मल्लांना बघून राहुल गांधी पदयात्रेतून आखड्याच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी मल्लांची कुस्ती बघितली. त्यांच्याशी हात मिळवून मल्लांचे आभार मानले. आखाडा बाळापूर परिसरातील ही घटना आहे.
7 / 9
सध्या राहुल गांधींची यात्रा नांदेडमधून पायी चालत असताना मराठवाड्याच्या हद्दीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचेही फोटो झळकल्याचे दिसून आलं. सध्या ही यात्रा परभणीत आहे
8 / 9
एका काँग्रेस कार्यकर्त्याने विलासराव देशमुख यांच्या फोटोसह यात्रेत सहभाग घेतला. काही वेळानंतर हा विलासरावांचा चाहता राहुल गांधींच्या जवळ पोहोचल्याचे दिसून आले.
9 / 9
विशेष म्हणजे राहुल गांधींनीही या युवकासोबत फोटो काढला, यावेळी नाना पटोलेही सोबतच होते. अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे, त्याने लव्हचे सिम्बॉल दिले आहेत.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRitesh Deshmukhरितेश देशमुख