विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशोगाथेचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 10:45 PM2018-02-22T22:45:36+5:302018-02-22T22:51:23+5:30

लोकमत प्रोफेशनल आयकॉन्स ऑफ विदर्भ या विशेष समारंभात विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशोगाथेचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार.

बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात लोकमतने 100 वर्षातही विश्वसनीयता कायम राखली, असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमातील लोकमत सेल्फी पॉईंट उपस्थितांचे आकर्षण ठरला होता.