नागपुरात विज्ञानाचा महोत्सव; Indian Science Congress मधील 'हे' खास फोटो एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:54 PM2023-01-03T16:54:11+5:302023-01-03T18:31:52+5:30

नागपूर : १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसला आजपासून सुरुवात झाली आहे. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यावेळी इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. मंगळवारपासून (दि. ३) सुरू झालेली ही परिषद ७ जानेवारीपर्यंत चालणार असून यात रसायनशास्त्राच्या दोन नोबेल विजेत्यांसह देश-परदेशातील शेकडो वैज्ञानिक, तरुण संशोधक तसेच विद्यार्थी सहभागी होतील. या अधिवेशनातील काही खास क्षणचित्रे. (फोटो - विशाल महाकाळकर)

१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसला आजपासून सुरुवात

कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती. पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.

शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यावेळी इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद

या वर्षीची थीम : शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व त्याद्वारे महिला सबलीकरण

इस्त्रोची माहिती देणारी गाडी 'स्पेस ऑन व्हिल्स'; इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण

१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या (ISC) तांत्रिक सत्रांची १४ विभागांमध्ये विभागणी

तरुणांमध्ये विज्ञानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न

या १४ विभागांव्यतिरिक्त, महिला विज्ञान परिषद, शेतकरी विज्ञान परिषद, बाल विज्ञान परिषद, आदिवासी संमेलन, विज्ञान आणि समाज परिषद तसेच एक विज्ञान संप्रेषक परिषददेखील भरवण्यात येणार आहेत.

विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये विविध ठिकाणी समांतर सत्रे

पाच दिवस विज्ञानाचा उत्सव

तरुणाईचा अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद

काही क्षणचित्रे

3-७ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत रसायनशास्त्राच्या दोन नोबेल विजेत्यांसह देश-परदेशातील शेकडो वैज्ञानिक, तरुण संशोधक तसेच विद्यार्थी सहभागी होतील