शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Devendra Fadanvis: 'आई तुझा आशीर्वाद...' फडणवीसांचा मातोश्रींसोबतचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 7:47 PM

1 / 9
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सोमवारी नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला.
2 / 9
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर, इतरही बंडखोर आमदार त्यांच्या मतदारसंघात गेले.
3 / 9
नागपुरात, फडणवीसांच्या स्वागताला भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत झालं, त्यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या.
4 / 9
नागपूर विमानतळावरून देवेंद्र फडणवीस यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. नागपूरकरांना आमच्यावर नेहमीच प्रेम केले आहे.
5 / 9
आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलो असता प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक जमले. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आहे.
6 / 9
आपल्यावर एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची मला जाणीव आहे. ती योग्य प्रकारे पार पडण्याचा संकल्प आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यानंतर, फडणवीस यांनी आपल्या नागपुरातील घरी जाऊन आई आणि कुटुंबातील सदस्यांचे दर्शन घेतले.
7 / 9
देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अलिंगन देत, औक्षण करत त्याचं स्वागत केलं. यावेळी, त्यांच्या आईने मायेनं डोक्यावर हात ठेवला. फडणवीस यांनी तोच आईचा आशीर्वाद... असे म्हणत फोटो ट्विटवरुन शेअर केला आहे.
8 / 9
आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाचा स्नेह असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले असून कुटुंबातील सदस्यांसमवेतचे घरातील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय लढाई जिंकल्याचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे.
9 / 9
राज्यात शिंदे आणि फडणवीस याचं सरकार आलं असून शिवसेनेतील मोठ्या बंडाळीनंतर हे सरकार स्थापन झालं आहे. त्यात, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा रोल आहे, हे स्वत: एकनाथ शिंदेंनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितले.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाnagpurनागपूरEknath Shindeएकनाथ शिंदे