नागपुरात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 20:58 IST2019-06-05T20:47:27+5:302019-06-05T20:58:17+5:30

संपूर्ण महिनाभर कडकडीत रोजे, पाचवेळेचा नियमित नमाज, कुराणपठण अन् अल्लाहचे स्मरण करीत रमजान महिना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर येणारी पवित्र व मंगलमय मानली जाणारी रमजान ईदही उपराजधानीत आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. एकमेकांना शुभेच्छा देऊन स्नेहमय संबंध दृढ करण्यात आले. यानिमित्त मोमिपुऱ्यातील फुटबॉल ग्राऊंडवर सामूहिक नमाज पठण झाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या