Amrinder Singh confusion : तणावातही गंमत, पंजाबच्या कॅप्टननेच दिला अमरिंदरसिंगला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 03:16 PM2021-09-30T15:16:35+5:302021-09-30T17:12:11+5:30

अमरिंदर सिंगचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमरिंदर सिंगांच्या या ट्विटनंतर माजी मुख्यमंत्री आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्याचे ट्वि रिट्विट केले आहे.

पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. यामुळे एकेकाळचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे मित्र असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले.

नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. आता दोन्ही सिंग ट्रेंडिंगमध्ये आहेत. परंतू याचा त्रास एका फुटबॉल प्लेअरला सहन करावा लागत आहे.

अमरिंदर सिंग असे त्याचे नाव असल्याने त्याला टॅग करून लोक ट्विट करू लागले आहेत. विशेष म्हणजे हा अरमिंदर सिंग भारतीय फूटबॉल संघाचा गोलकिपर आहे.

राजकारणात आहे तो अमरिंदर कोण हेच लोकांना कळत नसल्याने @ नंतर अमरिंदर टाकले की लोक त्यालाही टॅग करू लागले आहेत. यामुळे वैतागलेल्या अमरिंदरने लोकांसमोर हात जोडले आहेत.

हा खेळाडू भारतीय फुटबॉल टीमचा गोलकिपर अमरिंदर सिंग आहे. या अमरिंदरला मीडिया हाऊसदेखील टॅग करत आहेत. यामुळे वैतागलेल्या अमरिंदरने ट्विट केले आहे.

'मी अमरिंदर सिंग आहे, भारतीय फुटबॉल टीमचा गोलकीपर. पंजाबचा मुख्यमंत्री नाही. न्यूज मीडिया पत्रकारांनी मला टॅग करणे बंद करावे,' असे आवाहन केले आहे.

अमरिंदर सिंगचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमरिंदर सिंगांच्या या ट्विटनंतर माजी मुख्यमंत्री आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्याचे ट्वि रिट्विट केले आहे.

अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमधून फुटबॉलपटू अमरिंदर सिंग यांस दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या तरुण मित्रा, माझी तुला पूर्ण सहानुभूती आहे. तुझ्या खेळासाठी माझ्याकडून शुभेच्छा... असे कॅप्टन अमरिंदर यांनी म्हटलंय.

अमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे.

खरेतर कॅप्टन हे मंगळवारीच अमित शहांच्या भेटीला जाणार होते. परंतू तेवढ्यातच सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने एक दिवस उशिरा शाहांची भेट घेण्याचा निर्णय कॅप्टननी घेतला.