माणिके मगे हिते...!! ‘इंटरनेट सेन्सेशन’ योहानीची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री, ती कोण माहित नसेल तर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:00 AM2021-10-20T08:00:00+5:302021-10-20T08:00:01+5:30

Yohani : योहानीनं गायलेलं ‘Manike Mage hithe’ हे गाणं सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड करतंय. सिंहली भाषेतील या गाण्यानं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे...

‘माणिके मगे हिते’ हे गाणं सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड करतंय. सिंहली भाषेतील या गाण्यानं चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. श्रीलंकेतील सिंगींग सेन्सेशन योहानी हिनं हे गाणं गायलं आहे. आता ही योहानी बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.

योहानीला अलीकडे तुम्ही ‘बिग बॉस 15’च्या मंचावर सलमान खानसोबत पाहिलं असेलंच. ‘माणिके मगे हिते’ या गाण्यामुळे योहानी जगभर लोकप्रिय झाली आहे आणि आता काय तर बॉलिवूडची कवाडं तिच्यासाठी खुली झाली आहेत.

होय, भूषण कुमार यांची निर्मिती असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटातून योहानी बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. या सिनेमात योहानीच्या या सुपरहिट गाण्याच्या हिंदी वर्जनचा समावेश करण्यात आला असून हे गाणं योहानीच गाणार आहे.

‘थँक गॉड’ या सिनेमात अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमा आहे.

22 मे रोजी योहानीने ‘माणिके मगे हिते’ हे गाणं आपल्या युट्यूब चॅनलवर लॉन्च केलं होतं. हळूहळू हे गाणं सुपरडुपर हिट झाला.

सिंहली भाषेत असल्यानं अनेकांना त्याचा अर्थ कळला नाही. पण योहानीचा आवाज आणि कर्णमधूर संगीत यामुळे ते हिट झालं.

केवळ चार महिन्यात या गाण्याल 12 कोटींपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या गाण्यानं वेड लावलं आहे.

Read in English