पाहा फोटो : लोक ‘चिंकी’ म्हणून चिडवायचे, आज तीच बनली ‘सुपरमॉडल ऑफ द इअर’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 03:33 PM2020-03-18T15:33:57+5:302020-03-18T15:46:08+5:30

सुपरमॉडल ऑफ द इअर 2020

एमटीव्हीचा बहुचर्चित रिअ‍ॅलिटी शो ‘सुपरमॉडल ऑफ द इअर’चा किताब यावेळी सिक्कीम गर्ल मनीला प्रधानने जिंकला.

मलायका अरोरा, मिलिंद सोमण आणि मसाबा गुप्ता हे तिघे ‘सुपरमॉडल ऑफ द इअर’च्या यंदाच्या सीझनचे जज होते.

शोच्या ग्रँड फिनालेमध्ये मनीलाने द्रिशा मोरे व प्रिया सिंग यांना मागे टाकत ‘सुपरमॉडल ऑफ द इअर’च्या किताबावर आपले नाव कोरले.

अनुषा दांडेकर हिने हा शो होस्ट केला होता.

हा शो जिंकल्यानंतर मनीला सोशल मीडियावर ट्रेंड करतेय.

एकेकाळी मनीलाला दिसण्यावरून सतत डिवचले जायचे. अनेक लोक तिची खिल्ली उडवत तिला ‘चिंकी’ म्हणून बोलवायचे.

लोकांनी ‘चिंकी’ म्हणून हिणवलेली हीच मुलगी आज फॅशन जगताचा ‘इंटरनॅशनल फेस’ बनली आहे.

मनीलाचा शोमधील प्रवासही संघर्षपूर्ण ठरला. शोमध्ये जजेसनी तिला ‘सायलेन्ट किलर’ हे नाव दिले होते.

शांत राहणे आणि टास्कवर लक्ष केंद्रीत करणे, हेच तिने केले.

शोमध्ये अनेकदा तिला मलायकाच्या वाईट कमेंट्स सहन कराव्या लागल्या. पण तिने त्या सकारात्मकपणे घेत, वेळोवेळी स्वत:त बदल केले.

‘सुपरमॉडल ऑफ द इअर’ हा शो जिंकणे माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे, असे मनीला म्हणाली.

हा शो जिंकल्यानंतर मनीलावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.