शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:44 IST

1 / 9
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सोलापूर येथील पडळकर समर्थक शरणू हांडे यांचं फिल्मी स्टाईल अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सतर्कता राखत ५ तासांत हांडेची सुटका केली आहे.
2 / 9
जुन्या वादातून शरणू हांडेचे अपहरण करण्यात आल्याचे पुढे आले आहे. २०२१ साली गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. यात पडळकरांच्या वाहनाची काच फुटली होती. त्यावेळी पडळकर समर्थक शरणू हांडे आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्याचाच बदला हांडेच्या अपहरण आणि मारहाणीतून घेण्यात आला असा आरोप आहे.
3 / 9
शरणू हांडे अपहरण प्रकरणानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांची शासकीय रुग्णालयात जात विचारपूस केली. त्यानंतर पडळकरांनी या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर गंभीर आरोप केले. या प्रकरणाचा मास्टरमाईंड रोहित पवार असल्याचा आरोप त्यांनी केला
4 / 9
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, २०२१ च्या घटनेत कलम ३०७ चा गुन्हा दाखल करा अशी मी मागणी केली होती. माझ्या वाहनावर दगड फेकला होता. जेव्हा माझ्या वाहनावर दगड टाकला, तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. अजून त्याचा तपास लागलेला नाही. दगड टाकल्यानंतर आशीर्वाद घ्यायला हे शरद पवारांकडे गेले होते असं सांगत त्यांनी फोटो दाखवले.
5 / 9
सोबतच २०२१ साली ही घटना घडली होती. रोहित पवार हा अपहरण आणि मारहाणीचा मास्टरमाईंड आहे. एकाच कुटुंबातील लोकांसोबत फोटो कसे?. माझ्या वाहनावर दगडफेक करा यासाठी रोहित पवारांनी बैठक घेतली होती. या घटनेतील राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता होता, महादेव देवकाते याने मला ते सांगितले होते. २०२१ मध्ये जे प्रकरण घडले त्यात देवकातेचा जबाब पोलिसांनी नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली.
6 / 9
तसेच दिवसेंदिवस हे प्रकरण वाढत गेले. यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली त्यावर हे कुटुंब काही बोलत नाही. मी तिथे गेल्यानंतर हे लोक बिथरलेले आहे. त्यामुळे आम्हाला कसं दबावात टाकले जाईल. आमच्यासोबतच्या कार्यकर्त्यांवर दहशत कशी निर्माण करता येईल त्यातून ही घटना घडली आहे असा आरोप पडळकरांनी केला.
7 / 9
शरणूला वाहनात जबरदस्तीने टाकले, बेदम मारहाण केली. त्याला मारून टाकण्याचा प्लॅन केला. अमानुषपणे त्याची हत्या करायची, व्हिडिओ टाकायचे हे ठरले होते. या प्रकरणातील आरोपीचे मूळ शोधा, कारमधून व्हिडिओ कॉल केला होता, तो कुणाला केला होता, कुणाची माफी मागायला लावली हे पोलिसांनी शोधावे अशी मागणी पडळकरांनी केली.
8 / 9
हे प्रकरण खूप गंभीर आहे. या मुलांच्या पाठीशी कुणीतरी मोठा हात असेल त्याशिवाय हे धाडस कुणी करू शकत नाही. शरणू हांडे हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला. अजून काही उशीर झाला असता तर घातपात घडला असता. २०२१ च्या दगडफेक प्रकरणी फेरतपास करावा असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
9 / 9
दरम्यान, रोहित पवारांना त्या प्रकरणात आरोपी केले पाहिजे. या घटनेत ३०७ चे कलम लावले पाहिजे. शरणू हांडे प्रकरणाच्या मुळाशी गेले पाहिजे. पुण्यातून गाडी भाड्याने कशी मिळू शकते, या मुलांचा शोध घेतला पाहिजे. या प्रकरणाचा पूर्ण शोध घेऊन मकोका अंतर्गत कारवाई करते येते का याचा पोलिसांनी विचार करावा असंही पडळकर यांनी म्हटलं.
टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरRohit Pawarरोहित पवारBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस