मुसळधार पावसामुळे कुठे घरावर झाड कोसळले तर, कुठे शेती पिकांचे नुकसान झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 17:59 IST2017-09-20T17:54:48+5:302017-09-20T17:59:37+5:30

मुसळधार पावसामुळे माथेरानमध्ये एका घरावर झाड कोसळले. सुदैवाने यावेळी घरातील माणसे बचावली.

माळशेज घाटातून जाणारा कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 सुमारे दोन ते तीन तास वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता.

रायगड जिल्ह्यात पावसामुळे काही ठिकाणी भातपिकांचे नुकसान झाले आहे.

डोंबिवलीत पावसाची संततधार सुरु असल्याने एमआयडीसी परिसरात पाणी जमा झाले होते.

मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्याने अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली.