Jan Dhan Yojana: जनधन खात्याचे फायदे कोणते? विमा, वारसदाराला पैसे, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 10:29 AM2021-08-23T10:29:52+5:302021-08-23T10:44:07+5:30

Pradhan Mantri Jan Dhan Yojana benefits: राज्यातील ३.४ कोटी नागरिकांकडे जनधन खाते. ग्रामीण खातेधारक सर्वाधिक, १० हजार ३९ कोटी जमा. जाणून घ्या फायदे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली जाहीर केलेल्या जनधन योजनेअंतर्गत राज्यभरात आतापर्यंत ३.४ कोटी नागरिकांनी जनधन खाती उघडली आहेत. या खात्यांमध्ये तब्बल १० हजार ३९.६१ कोटी रुपयांच्या ठेवी जमा असल्याची माहिती समोर आली आहे.

जनधन खातेधारकाला रुपे कार्ड दिले जाते. त्याद्वारे त्याला एक लाखाचा अपघात विमा मिळू शकतो. 'समाधानकारक' व्यवहार केल्यास कर्ज (ओव्हरड्राफ्ट) मिळते. शिवाय आयुर्विम्याचीही योजनाही लागू होते. त्यामुळे नागरिकांचा कल या योजनेकडे वाढत आहे.

यात ग्रामीण भागातील खातेधारकांची संख्या सर्वाधिक म्हणजे १ कोटी ७१ लाख ७५ हजार ६८५ इतकी आहे; तर १ कोटी ३३ लाख ८ हजार ५५६ खातेधारक हे शहरी आणि निमशहरी भागांतील आहेत.

राज्यात एकूण ३ कोटी ४ लाख ८४ हजार २४१ जनधन वापरकर्ते आहेत. देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकेशी जोडण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली.

पूर्वी झिरो बॅलन्स खाती वापरली जात नव्हती; पण आता ही खाती विविध कारणांसाठी वापरली जात असल्याने या माध्यमातून बँकांनाही त्यांच्या योजना लोकांपर्यंत नेता येतात.

जनधन खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याजाची सुविधा.

खातेधारकाला नि:शुल्क मोबाइल बँकिंगची सुविधा

जनधन खातेधारक आपल्या खात्यातून १० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट करू शकतो. म्हणजे खात्यात पैसे नसतानाही १० हजार रुपये काढता येऊ शकतात. ही सुविधा खाते सुरू केल्यानंतर काही महिन्यांनंतरच मिळते.

या जनधन खात्याद्वारे नि:शुल्क दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो.

खातेधारकाच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या वारसदाराला ३० हजारांचाही विमा मिळू शकतो.

या खात्यात कोणतीही किमान रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही; परंतु चेकबुकची सुविधा घेतल्यास मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे.

Read in English