शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS: रुळ तुटले...चाक रुतले...डबे उलटले! नाशिकमधील 'पवन एक्स्प्रेस'च्या दुर्घटनेची भीषण दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 5:15 PM

1 / 9
नाशिकमध्ये 'पवन एक्स्प्रेस'चे तब्बल ११ डबे रेल्वे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली. देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.
2 / 9
रेल्वे दुर्घटना इतकी भीषण होती की रेल्वेचे ११ डबे रुळावरुन घसरले आहेत. यात रेल्वे रुळ तुटून डबे उटल्याचं भीषण वास्तव छायाचित्रांमधून दिसून येत आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
3 / 9
दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन अलर्ट झालं असून वैद्यकीय आणि बजाव पथक घटनास्थळावर दाखल झालं आहे. बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. तसंच शहराचे कलेक्टर देखील घटनास्थळाच्या दिशेनं तातडीनं रवाना झाले आहेत.
4 / 9
रेल्वे क्रमांक ११०६१ पवन एक्स्प्रेस ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून (LTT) जयनगर (बिहार) येथे जात होती. दरम्यान नाशिक जवळील देवळाली येथे दुपारी तीन वाजून १० मिनिटांच्या सुमारास रेल्वेचे काही डबे घसरल्याची माहिती समोर आली
5 / 9
रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी यासाठी 0253-2465816 (नाशिक) हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
6 / 9
देवळाली लहवित दरम्यान घसरलेल्या पवन एक्सप्रेस मधील जखमी प्रवाशांना 108 आपत्कालीन वैद्यकीय पथकाच्या चार रुग्णवाहिका मार्फत तातडीने नाशिक रोड जवळील बिटको रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
7 / 9
तीन ते चार प्रवाशी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी रवाना झाली आहे. मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.
8 / 9
मुंबईतील सीएसएमटीच्या टीसी ऑफीसकडूनही MTNL: 02222694040 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.
9 / 9
मुंबईतील सीएसएमटीच्या टीसी ऑफीसकडूनही MTNL: 02222694040 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.
टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे