स्मृतीदिन : बुद्धीबळाच्या पटावरुन राजाच झालाय वजा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 11:31 IST2021-06-03T11:04:29+5:302021-06-03T11:31:40+5:30
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिनी असल्याने राजकीय दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडून त्यांच्या आठवणीही जागविण्यात येत आहेत.

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिनी असल्याने राजकीय दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडून त्यांच्या आठवणीही जागविण्यात येत आहेत.
काय केली चूक आणि कसली दिली सजा। बुद्धी बळाच्या पटावरून राजाच झाला वजा॥
भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाचं अशा शब्दांत वर्णन केले होतं.
जून 2014 मधील विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास संपताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांनी राज्यासाठी केलेल्या कार्याबद्दल ‘कृतज्ञता’ व्यक्त करणारा ठराव मांडला.
मुंडे यांच्या कार्याचा आढाव घेत असताना त्यांच्यावर लोकांचे किती प्रेम होते, त्यांच्या जाण्याचे दु:ख पचवणे अवघड झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जमावाने कसा उद्वेग व्यक्त केला, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी तर आपले अश्रू आवरणेही कठीण झाले. दोनच दिवसांपूर्वी मुंडेंसोबत बैठक झाली. खरे तर ही बैठक नंतर घ्यावी, असे मी म्हणालो होतो.
मात्र मुंडे म्हणाले, पुन्हा नको आताच घ्या. पुढे आपल्याला कुठे वेळ आहे, हे त्यांचे शब्द मला अस्वस्थ करतात, असे भावनिक शब्द खडसेंनी त्यावेळी काढले होते.
पुढे खडसे बोलत असताना त्यांच्यामागे बसलेले देवेंद्र फडणवीस यांना आपले अश्रू आवरणे अवघड झाल्याने सारखे डोळे पुसावे लागत होते. सभागृहातील अनेकांची अवस्था तशीच झाली होती
विधिमंडळात गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं भावूक होऊन देवेंद्र फडणवीसांनी, बुद्धी बळाच्या पटावरून राजाच झालाय वजा, हे उद्गार काढले होते.
शब्द देवेंद्रांच्या मुखातले होते, पण महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेच्या मनातील भावनाच होती ती, लाखो ऊतसोड कामगारांच्या डोळ्यात तरळणाऱ्या अश्रूत दिसणारेही शब्द तेच होते.