By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:09 IST
1 / 10अशोक खरातला वाचवण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी पोलिसांवर प्रचंड दबाव आणला आणि तपासात अडथळे आणल्याचा खळबळजनक प्राथमिक निष्कर्ष पोलीस सूत्रांनी काढला आहे. याच प्रकरणाचा धसका घेत चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.2 / 10कॅप्टन खरात केवळ महिलांचे शोषणच करत नव्हता, तर त्याच्या आश्रमात येणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांच्या जोड्या जुळवून त्यांचे व्हिडीओ बनवत असे. या आधारे त्याने अनेक बड्या लोकांना ब्लॅकमेल केल्याची माहिती आहे.3 / 10खरात ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र अहिल्यानगर पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे तपास करत त्याची नाकेबंदी केली आणि १७ मार्च रोजी त्याला बेड्या ठोकल्या.4 / 10१८ फेब्रुवारी रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात निरज जाधव नावाच्या तरुणाविरुद्ध एका मुलीने ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली होती. या तक्रारीमागे स्वतः खरातचा हात होता, असा पोलिसांचा संशय आहे.5 / 10पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि फिर्यादी मुलीला खरातसोबतच्या संबंधांबाबत प्रश्न विचारले, तेव्हा रूपाली चाकणकर यांनी थेट आक्षेप घेतला.6 / 10पीडितेला अनावश्यक प्रश्न का विचारता? असे म्हणत चाकणकर यांनी अहिल्यानगर पोलिसांना फैलावर घेतले. तपासाचा भाग म्हणून विचारलेल्या प्रश्नांमुळे चिडलेल्या चाकणकर यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची धमकी दिली होती.7 / 10१७ मार्च रोजी महिला आयोगात खास सुनावणी लावून नगर पोलिसांना धारेवर धरण्यात आले. खरात प्रकरणात चाकणकर एवढा दबाव का आणत होत्या, हे संशयास्पद आहे.8 / 10चाकणकर यांचा हस्तक्षेप वाढल्याचे पाहून अहिल्यानगर पोलिसांनी गोपनीयता पाळली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि त्यांच्या टीमने या प्रकरणाची सविस्तर माहिती थेट पोलीस महासंचालकांना दिली. महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांना यातील गांभीर्य सांगितल्यावर, गुप्तपणे पुरावे गोळा करण्याचे आदेश मिळाले. 9 / 10अशोक खरातचा ड्रायव्हर असलेला निरज जाधव गायब झाला होता. त्याच्या आईने पोलिसांकडे विनंती केली होती की, 'निरजकडे खरातची महत्त्वाची कागदपत्रे आहेत, त्याला संरक्षण द्या, तरच तो वाचेल.' 10 / 10अशोक खरातचा ड्रायव्हर असलेला निरज जाधव गायब झाला होता. त्याच्या आईने पोलिसांकडे विनंती केली होती की, 'निरजकडे खरातची महत्त्वाची कागदपत्रे आहेत, त्याला संरक्षण द्या, तरच तो वाचेल.' पोलिसांनी निरजला शोधून काढले आणि त्याच्याकडून खरातचे अश्लील व्हिडीओ हस्तगत केले. यामुळेच खरातचे पाप जगासमोर आले.