By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 20:16 IST
1 / 8सोशल मीडियावर सध्या ९० च्या दशकातील मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या बांधकामाचे काही दुर्मिळ फोटो व्हायरल होत आहेत. 2 / 8एकेकाळी 'सिंगल लेन'च्या जुन्या हायवेवर ७-८ तास अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक्सप्रेसवे म्हणजे एक वरदान ठरला होता. 3 / 8पण कालच्या टँकर अपघातानंतर ३० तास बंद पड़ल्याने आता हाच मार्ग 'नेक्स्ट जनरेशन' प्रवासासाठी सज्ज करण्याची मागणी केली जात आहे. 4 / 8मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा याच प्रगतीचा जिवंत पुरावा आहे. ९० च्या दशकात सुरू झालेलं हे स्वप्न आता 'मिसिंग लिंक' प्रकल्पाद्वारे अधिक वेगवान होणार आहे.5 / 8लोणावळा-खंडाळा घाटातील ट्रॅफिकपासून सुटका करण्यासाठी आशियातील सर्वात रुंद बोगदे बांधले जात आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ आणखी २०-२५ मिनिटांनी कमी होईल. 6 / 8संपूर्ण मार्गावर हाय-टेक कॅमेरे आणि एआय (AI) द्वारे देखरेख ठेवली जाणार आहे, ज्यामुळे अपघात कमी होऊन सुरक्षितता वाढेल. 7 / 8इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स आणि प्रगत सोयीसुविधांनी हा मार्ग सज्ज होत आहे.8 / 8असे असले तरी सध्याचा वाहन कंपन्यांचा महिन्याला चार लाख वाहनांचा खप पाहता लवकरच आणखी एका स्वतंत्र मार्गाची गरज पडणार आहे. (फोटो : साभार इंटरनेट, अज्ञात फोटोग्राफर)