1 / 5१७ मे ते १५ जून २०२६ या काळात अधिक मास' येत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यानंतर लगेच जुलैपासून गुरू आणि शुक्र ग्रहांचा अस्त होणार असून, चातुर्मासाची सुरुवात होईल. या काळात मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. तसेच ऑक्टोबरपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असल्याने त्याचाही परिणाम विवाह मुहूर्तावर होणार आहे. यामुळे विवाहासाठी मुहूर्ताचा मोठा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे विवाह इच्छुकांची लगबग सुरू आहे. आता जेमतेम १४ दिवस मुहूर्त शिल्लक असल्याने धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.2 / 5असे आहेत आठ महिन्यांतील प्रमुख अडथळे : १७ मे ते १५ जून: अधिक मास असल्याने शुभकार्ये बंद, जुलैपासून गुरू-शुक्राचा अस्त आणि चातुर्मास प्रारंभ, ऑक्टोबरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे मुहूर्ताची अडचण, पुढील मुहूर्त थेट जानेवारी २०२७ मध्ये.3 / 5पुढील १३ दिवसांत शुभमुहूर्त पाहून लग्न उरकावे लागणार आहे. नाहीतर आठ महिने थांबावे लागणार आहे. आता नाही तर थेट पुढल्या वर्षी विवाह करावा लागणार असल्याने तारांबळ उडाली आहे.4 / 5एकाच दिवशी अनेक लग्न, नातेवाइकांचा फज्जा : मुहूर्ताच्या या टंचाईमुळे सध्या मंगल कार्यालये, बँड पथक, केटरिंग आणि फोटोग्राफर्सकडे बुकिंगचा महापूर आला आहे. एकाच दिवशी अनेक लग्नसोहळे असल्याने सेवा पुरवठादारांवर मोठा ताण् येत आहे. ग्रामीण भागात तर आचारी आणि इतर व्यवस्था मिळणे कठीण झाले असून, ऐनवेळी मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. एकाच दिवशी अनेक लग्न असल्याने नातेवाइकांपुढेही पेच निर्माण होणार आहे.5 / 5अनेक लग्नसोहळे असल्याने सेवा पुरवदारांवर ताण : मुहूर्ताच्या या टंचाईमुळे सध्या मंगल कार्यालये, बँड पथक, केटरिंग आणि फोटोग्राफर्सकडे बुकिंगचा महापूर आला आहे. एकाच दिवशी अनेक लग्न सोहळे असल्याने सेवा पुरवठादारांवर मोठा ताण् येत आहे. ग्रामीण भागात तर आचारी आणि इतर व्यवस्था मिळणे कठीण झाले असून, ऐनवेळी मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.