आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:33 IST2025-06-06T15:29:26+5:302025-06-06T15:33:25+5:30

Prithvi Ambani school fees: आता अंबानींची मुले ज्या शाळेत शिकतात ती शाळा हाय प्रोफाईलच असणार. मुकेश अंबानी-नीता अंबानी यांच्या नातवाचे नाव पृथ्वी अंबानी असे आहे.

नीता अंबानी या मुंबई इंडियन्सच्या सामान्यावेळी त्यांच्या नातवासोबत दिसल्या होत्या. यानंतर मुकेश अंबानींच्या या नातवाची सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. तो कुठल्या शाळेत जातो, त्या शाळेची फी किती...

आता अंबानींची मुले ज्या शाळेत शिकतात ती शाळा हाय प्रोफाईलच असणार. मुकेश अंबानी-नीता अंबानी यांच्या नातवाचे नाव पृथ्वी अंबानी असे आहे. आकाश अंबानी यांचा तो मुलगा आहे.

पृथ्वी ज्या शाळेत जातो त्या शाळेचे नाव त्याची आजी म्हणजेच नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल (NMAJS) असे आहे. बॅकलॅरिएट वर्ल्ड स्कूलचा दर्जा या शाळेला मिळाला आहे.

पहिल्या वर्षाचे शिक्षण आंतरराष्ट्रीय बॅकलॅरिएटच्या प्राथमिक वर्ष कार्यक्रम (PYP) अंतर्गत केले जाते. त्यानंतर, येथे मध्यम वर्ष कार्यक्रम (MYP) देखील शिकवले जाते.

दोन ठिकाणी ही शाळा आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या शाळेचे कॅम्पस आहेत.

नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूलची एक वर्षाची फी ₹१४ लाख ते ₹२० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचीच ही शाळा आहे.