जवाहर द्विप येथील डिझेल टँकवर पडली वीज! मोठी आग, हजारो लिटर डिझेल भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 23:10 IST2017-10-06T23:06:31+5:302017-10-06T23:10:58+5:30

मुंबईतल्या भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्विप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळली व डिझेल टँकना आग लागली.
आगीमुळे मोठ्या प्रमाणावर डिझेल जळून भस्मसात झाले आहे. या बेटावर १५ ते २० टँक आहेत.
जवाहर द्विप बेटावरील १२ नंबरच्या टँकला आग लागल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
समुद्रातून तेल काढून मोठ्या जहाजाद्वारे जवाहर द्विपवर आणली जातात. तेथे डिझेल साठवून ठेवले जाते.
समुद्रात आग विझवण्यासाठी बंब कसे न्यायचे यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. भाऊच्या धक्क्यावर हजारो लोक जमले आहेत