शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:49 IST

1 / 5
पाथर्डी येथे आयोजित केलेल्या सभेला जात असताना लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यात गाडीतील लोक सुदैवाने वाचले.
2 / 5
लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, ते दौंडमार्गे आम्ही नगर बायपासने पाथर्डीकडे जात होते. बायपासवर वळणार होतो. तिथे सारंगी नावाचं हॉटेल आहे. तिथेच ही घटना घडली.
3 / 5
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांच्या दोन गाड्या सोबत असताना हा हल्ला करण्यात आला. आठ ते दहा लोकांनी गाडीवर लाठ्यानी हल्ला केला.
4 / 5
हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी दोन पोलिसांच्या गाड्या होत्या. दहा-बारा पोलीस अधिकारी, कर्मचारी होते. पोलिसांना न घाबरता आठ-दहा लोकांनी बाबूंने गाडीवर हल्ला केला.
5 / 5
अहिल्यानगर जिल्ह्यात घडलेल्या घटनेनंतर हाके पुढे सभेसाठी रवाना झाले. त्यांनी जीव जाईपर्यंत आपण ओबीसींसाठी लढत राहणार असल्याचे सांगितले.
टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेAhilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसOBCअन्य मागासवर्गीय जाती