शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पसंतीचे चॅनेल पाहण्यासाठी किती पैसे लागणार? TRAI चे चॅनल सिलेक्टर अ‍ॅप्लिकेशन आले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 3:14 PM

1 / 8
जेवढे पाहू तेवढ्याच चॅनलचे पैसे देण्यासाठी ट्रायने नवीन नियम आणला आहे. डीटीएस कंपन्यांकडून फसवणूक टाळता यासाठी ट्रायने चॅनल सिलेक्टर अॅप्लिकेशन आणले आहे. हे अॅप्लिकेशन ट्रायच्या वेबपेजवरच असून याद्वारे तुम्हाला अंदाजित खर्च मोजता येणार आहे.
2 / 8
नेटवर्क कॅपॅसिटी फी (NCF) 130 रुपये आणि कर अशी 154 रुपये आकारली जाणार आहे. यानंतर तुम्हाला हवे असलेले चॅनेल निवडावे लागणार आहेत. या चॅनलच्या किंमती आणि त्यांची निवड केल्यानंतर तुमच्या कार्टमध्ये त्याची किंमत दिसणार आहे. एखाद्या ऑनलाईन शॉपिंग कार्ट प्रमाणेच हे अ‍ॅप्लिकेशन बनविण्यात आले आहे.
3 / 8
यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे NCF किंवा फ्री टू एअर (FTA) चॅनेल आणि विकत घ्यावे लागणारे चॅनेल. या रकमेची गोळाबेरीज करूनच एमआरपी तुम्हाला दिसणार आहे. या वेबसाईटवर नाव टाकल्यानंतर राज्य निवडावे लागेल.
4 / 8
यानंतर भाषा निवडावी लागेल.
5 / 8
चौथ्या स्टेपला तुम्हाला आवडणारी कॅटॅगरी म्हणजेच म्युझिक, स्पोर्ट आदी निवडावे लागेल.
6 / 8
पाचव्या स्टेपला एसडी आणि एचडीचा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला या अ‍ॅप्लिकेशनमध्ये जाता येणार आहे. या स्टेप तुम्ही स्किपही करू शकता. परंतू असे केल्यास पुढे तुम्हाला देशातील इतर भाषां, चॅनेल कॅटॅगरी, राज्यांमधून चॅनेल निवडावे लागतील.
7 / 8
सुरुवातीला ट्रायच्या अ‍ॅप्लिकेशनवर 154 रुपये दिसत आहेत. ही NCF फी आहे. वर उजव्या बाजुला ही रक्कम दिसत आहे.
8 / 8
आपल्या आवडीचे चॅनेल सिलेक्ट केल्यावर त्या चॅनल्या किंमतीनुसार पैसे वाढत आहेत. अशाप्रकारे साधारण 20 एसडी आणि 20 एचडी चॅनल निवडल्यास 400 रुपयांचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. तुम्ही एक एक असा चॅनेल निवडू शकता किंवा चॅनेल कंपन्यांची बकेट लिस्टही निवडू शकता. बकेट लिस्ट निवडल्यास हे पॅकेज काहीसे स्वस्त मिळू शकते.
टॅग्स :DTHडीटीएचTelevisionटेलिव्हिजन