Maharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे

Published: October 13, 2019 01:29 PM2019-10-13T13:29:56+5:302019-10-13T13:33:33+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली जाहीर सभा जळगावात पार पडली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यावरुन विरोधकांना टीकेचं लक्ष्य केलं. 5 ऑगस्टला तुमच्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन भाजपा आणि एनडीए सरकारने देशात ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या 70 वर्षापासून विकासापासून वंचित असलेल्या काश्मिरी लोकांना न्याय मिळाला.

जम्मू काश्मीर आणि लडाख हा फक्त जमिनीचा तुकडा नसून भारतमातेचं मस्तक आहे. तेथील मातीचा प्रत्येक कण भारताला मजबूत करतो.

जर विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आगामी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कलम 370 पुन्हा लागू करु असं घोषित करावं असं आव्हान नरेंद्र मोदींनी भाषणात केलं.

थकलेले पक्ष एकमेकांचा आधार बनू शकतात पण महाराष्ट्रातील तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही असा टोला मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला.

2022 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येकाला घर, पाणी देण्याचा संकल्प भाजपाचा आहे, जल जीवन मिशनसाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!