शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कौंडण्यपूरला तुम्ही कधी भेट दिली का? श्रीकृष्णाने रुक्मिणीचे कौंडण्यपुरातूनच हरण करून द्वारकेत केला होता विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:17 IST

1 / 4
आप्पासाहेब कामथ यांनी २५ मे २०१२ रोजी प्रकाशित केलेल्या 'कौंडण्यपूर महिमा' या पुस्तिकेनुसार, या क्षेत्रावर कधीकाळी विदर्भराजा भीष्मक यांचे राज्य होते. त्यांना रुक्मी, रुक्मार्थ, रुक्मकेशा व रुक्ममाली अशी मुले होती. भगीरथ ऋषींची आई देशीनी, लावण्यवती राजकन्या, अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा, नलराजाची पत्नी दमयंती, राजा दशरथाची पत्नी व श्रीरामाची आजी इंदमती तसेच श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी या सर्वांचे माहेर कौंडण्यपूर असल्याचा दावा कामथांनी केला आहे. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून रथाने द्वारकेत नेल्याच्या आख्यायिकेचे संदर्भश्रीम‌द्भागवत (स्कंध १०, अध्याय ५०, श्लोक १६ ते २६), महाभारत (सभापर्व), विष्णुपुराण तसेच हरिवंश या ग्रंथांशी जुळतात, असेही त्यांनी नमूद केले आहे.
2 / 4
रुक्मिणीहरणाची कथा - रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी व्हावा, अशी भीष्मक राजाची इच्छा होती. मात्र मोठा पुत्र रुक्मी याचा या विवाहाला तीव्र विरोध होता. बहिणीचा विवाह शिशुपालाशी व्हावा, यासाठी तो भीष्मकावर दबाव टाकत होता. रुक्मिणीची या विवाहाला मुळीच पसंती नव्हती. श्रीकृष्णाची कीर्ती ऐकून तिने त्यांनाच मनोमन पती मानले होते. अखेर दबावामुळे शिशुपालाशी विवाह ठरविण्यात आला. विवाहासाठी शिशुपाल हा मित्र जरासंध, साल्व, पौंड्रक यांच्यासह मोठा लवाजमा घेऊन कौंडण्यपुरात दाखल झाला. विवाहविधी सुरू असताना रुक्मिणी दासीसह अंबिका मातेच्या मंदिरात पूजेसाठी गेली. पूजेनंतर मंदिराबाहेर पडताच श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले. यानंतर शिशुपाल व श्रीकृष्णात युद्ध झाले; मात्र अखेरीस श्रीकृष्ण रुक्मिणीसह द्वारकेत पोहोचून विवाहबद्ध झाला, अशी लोककथा प्रचलित आहे. नल-दमयंतीची प्रेमकथाही कौंडण्यपुरातील भीमटेकड्यांभोवती गुंफलेली असल्याची दंतकथा एक आहे.
3 / 4
कौंडण्यपूरचे पुरातत्त्वीय महत्त्व - १९२८ मध्ये अमरावतीचे तत्कालीन न्यायाधीश ए. आर. देशपांडे यांनी कौंडण्यपूरच्या पुरात्तत्त्वीय महत्त्वाकडे प्रथम लक्ष वेधले. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे का. ना. दीक्षित (१९३६) तसेच पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या अभ्यासकांनी येथे संशोधन केले.
4 / 4
१९६२-६३ मध्ये महाराष्ट्र शासनाने मोरेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या उत्खननामुळे कौंडण्यपूरचा महिमा महाराष्ट्रात पोहोचला. श्रद्धा, परंपरा आणि पुरातत्त्वीय वारसा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कौंडण्यपूर होय, हा अभिमान गावकऱ्यांच्या मनात आहे.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती