By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 19:15 IST
1 / 5गेल्या सहा महिन्यांतील सोने-चांदीतील दरवाढ - सहा महिन्यांपूर्वी चांदीचा दर सव्वालाख रुपये प्रतिकिलो होता, तर सोन्याचे दर प्रतितोळा ९० ते ९५ हजार रुपयांच्या दरम्यान होते.2 / 5यंदा भाव कितीवर जाणार? - भविष्यात सोने-चांदीचे दर वाढणार असून, चांदीचे दर ३.७५ लाख रुपये किलो तर सोन्याचे दर १.७० लाख रुपये प्रतितोळ्यावर जाण्याची शक्यता सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.3 / 5नवीन वर्षात सोने किती हजारांनी वाढले? - २०२६ सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात साधारण ८ ते १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.4 / 5सहा महिन्यांपासून चांदीचे दर तीनपटीने वाढत आहेत - सहा महिन्यांपासून चांदीचे दर सातत्याने वाढत असून, दररोज सात ते आठ हजार रुपयांनी भाव वाढत आहेत. सोन्याबरोबरच चांदीची खरेदीही कमी झाली आहे, अशी माहिती सोन्या-चांदीचे व्यापारी हिमान वस्तानी यांनी दिली.5 / 5सोने-चांदीत दरवाढीची काय कारणे ? - आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरमधील चढउतार, युद्धजन्य परिस्थिती, गुंतवणुकीसाठी सोने-चांदीकडे वाढता कल आणि पुरवठ्यावरील मर्यादा ही दरवाढीची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोने-चांदीच्या या दरवाढीचा मात्र सर्वसामान्यांना फटका बसत आहे.