शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देवाभाऊंचा पगार वाढला! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना दरमहिना किती वेतन मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:08 IST

1 / 10
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बुधवारी भाजपा विधिमंडळ बैठकीत फडणवीसांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदावर त्यांचीच वर्णी लागणार यावर शिक्कामोर्तब झाले.
2 / 10
राज्य सरकारचा गाडा हाकण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांसह मंत्रिमंडळ आणि आमदारांना दरमहिन्याला पगार दिला जातो. त्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना किती पगार मिळणार हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. राज्यात मुख्यमंत्रि‍पदी विराजमान असलेल्या व्यक्तीला पगारासह इतर सुविधाही राज्य शासनाकडून पुरवल्या जातात.
3 / 10
विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला २३० हून अधिक जागांचे बहुमत मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून बरीच चर्चा रंगली होती. भाजपाने १३२ जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान मिळवला. परंतु महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती.
4 / 10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होईपर्यंत मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहावे अशी मागणी शिवसेना नेत्यांची होती. परंतु भाजपाने ती मागणी नाकारली. सर्वाधिक १३२ आणि मित्रपक्षांच्या ५ जागा मिळून भाजपाचं संख्याबळ १३७ इतके झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच हे जवळपास स्पष्ट करण्यात आले होते.
5 / 10
भाजपामध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर होते. फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती होती परंतु त्यांचे नाव घोषित करण्यास वेळ घेतला गेला. औपचारिक प्रक्रिया पार पाडून बुधवारी विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केली. त्यानंतर ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झाले.
6 / 10
राज्यात मुख्यमंत्रि‍पदी असलेल्या व्यक्तीला दरमहिना राज्य शासनाकडून पगार दिला जातो. शासनाने या पगारात वेळोवेळी सुधारणी केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांना दरमहिना ३ लाख ४० हजार इतके वेतन दिले होते. देशात सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या मुख्यमंत्र्‍यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही आहेत.
7 / 10
मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंना ३ लाख ४० हजार पगार महिन्याला मिळणार असून त्यासह इतर शासकीय सुविधाही त्यांना देण्यात येतील. त्यात मुंबईत सुसज्ज निवासस्थान, दैनंदिन भत्ता, वाहतूक भत्ता, वैद्यकीय सुविधा, खासगी सचिवांचे भत्ते, सुविधा दिल्या जातात. सरकारी निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला, वाहन आणि अधिकारी-कर्मचारी माध्यमातून मदतनीसही सरकारच्या माध्यमातूनच पुरवले जातात.
8 / 10
मुख्यमंत्र्‍यांसह राज्यातील आमदारांनाही लाखांमध्ये पगार दिला जातो. विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहातील सदस्यांना सारखेच वेतन आहे. या सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो. यात मूळ वेतन आणि महागाई आणि इतर भत्ते एकत्र करून हा पगार दिला जातो.
9 / 10
एका आमदाराचे मुळ वेतन हे १ लाख ८२ हजार २०० रूपये ऐवढे आहे. तर मूळ वेतनाच्या २८ टक्के महागाई भत्ता दिला जातो. म्हणजेच जवळपास ५२ हजार ०१६ रूपये महागाई भत्ता दिला जातो. त्यानुसार २ लाख ६१ हजार २१६ रूपये वेतन दिले जाते. पगाराव्यतिरिक्त आमदाराला अनेक प्रकारचे भत्ते आणि सुविधा मिळतात. आमदाराला त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील लोककल्याणकारी कामांवर खर्च करण्यासाठी वेगळा आमदार निधी मिळतो.
10 / 10
देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वेतन ३,६५,००० रुपये आहे, तर दिल्लीसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्र्‍यांना ३,९०,००० रुपये पगार आहे. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन देशात सर्वात कमी आहे. त्याचे वेतन १,०५,००० रुपये आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीAjit Pawarअजित पवार