शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

विमान अपघातानंतर लागलेल्या आगीत 'ब्लॅक बॉक्स'चं नुकसान होऊ शकते?; तज्ज्ञांचा दावा, एकदा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:41 IST

1 / 10
बारामती विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या अपघाताबाबत अनेकांच्या मनात आजही शंका आहेत. त्यात विमान अपघातानंतर सापडलेल्या ब्लॅक बॉक्सबाबत एअर एक्सिडेंट ब्यूरोने माहिती दिली आहे. या अपघातामुळे लागलेल्या आगीत ब्लॅक बॉक्स दिर्घकाळ उच्च तापमानात राहिल्याने त्यातील दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान झाले आहे असं सांगण्यात आले आहे.
2 / 10
विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातात ब्लॅक बॉक्स हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. या मदतीने तपास यंत्रणांना विमानाचा प्रवास, त्यातील तांत्रिक बिघाड आणि इतर संवादाची माहिती मिळते. ब्लॅक बॉक्स हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. विमान दुर्घटनेत शेवटच्या भागाला कमी मार लागतो त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स शेपटीच्या बाजूने बसवण्यात येतो.
3 / 10
विमानातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला ब्लॅक बॉक्स हा खरेतर काळ्या रंगाचा नसतो. हा केशरी रंगाचा एक बॉक्स असतो जो सहजपणे अपघातानंतर अधिकाऱ्यांना ओळख पटवता यावी यासाठी बनवलेला असतो. केशरी रंग खराब हवामान आणि इतर परिस्थितीत डोळ्यांना सहज दिसतो. त्यामुळे ब्लॅक बॉक्सचा रंग केशरी ठेवण्यात आलेला असतो.
4 / 10
या ब्लॅक बॉक्समध्ये विमानाची संपूर्ण माहिती साठवली जाते. ज्यात फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर यांचा समावेश असतो. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाची तांत्रिक माहिती असते, ज्यात हवामान, विमानाचा वेग, इंधनसाठा, विमानाची उंची आणि दिशा हे यातून कळते. या ब्लॅक बॉक्सची रेकॉर्डिंग क्षमता २५ तासांची असते.
5 / 10
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये विमानातील आवाज रेकॉर्ड होतो. ज्यात विमानातील पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत होणारे संभाषण रेकॉर्ड होते. त्यात २ तासांचे रेकॉर्डिंग केले जाते. यातून विमानात तांत्रिक बिघाड झाला की मानवी चुकीमुळे किंवा इतर कारणांमुळे अपघात झाला याची माहिती अधिकाऱ्यांना मिळू शकते. विमान अपघाताची सगळी माहिती तपास यंत्रणांना ब्लॅक बॉक्समधूनच मिळते.
6 / 10
याबाबत पायलट अमोल यादव सांगतात की, ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंगचे कुठलेही नुकसान होऊ नये यासाठी ब्लॅक बॉक्सचे बाह्य आवरण अत्यंत मजबूत बनवण्यात आलेले असते. त्यात स्टिल आणि टायटेनियमचा वापर करण्यात आलेले असते. जर विमान समु्द्रात क्रॅश झाले तर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी त्यावर एक सिग्नल बसवलेला असतो. हा अल्ट्रासाऊंड सिग्नल अपघातानंतर ३० ते ९० दिवसापर्यंत पाठवला जात राहतो.
7 / 10
विशेष म्हणजे विमान जर जमिनीवर आदळले तर त्याला मोठी आग लागण्याची शक्यता असते त्यासाठीच ब्लॅक बॉक्स १ तासापर्यंत १ हजार अंश सेल्सियसपेक्षाही जास्त तापमानात सुरक्षित राहू शकतो. समुद्रातील खारं पाणी आणि इतर ठिकाणी ६ हजार मीटरपर्यंत हा सुरक्षित राहू शकतो. सुरक्षा चाचणीत ब्लॅक बॉक्सला ७५० किलोमीटर प्रतितास या वेगाने काँक्रिटच्या भिंतीवर आपटले जाते. ५ मिनिटांकरता २.५ टन वजन यावर ठेवण्यात येते.
8 / 10
अजित पवारांच्या विमान अपघातावर २८ जानेवारी रोजी बारामती येथे कोसळलेल्या लिअरजेट ४५ च्या दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्सना तीव्र उष्णतेमुळे गंभीर नुकसान झाले ज्यामुळे भारतीय तपास यंत्रणांनी कॉकपिट ऑडिओ डेटा रिकव्हर करण्यासाठी विशेष परदेशी मदत घेणार असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.
9 / 10
तर विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला होता, हा गंभीर चिंतेचा विषय आहे. पवार कुटुंबाला संशय असेल तर त्यांना तपासाची मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मागील अनेक घटनांमध्ये विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित सापडले आहे मात्र या अपघातात ब्लॅक बॉक्स जळाला हे शंका येणारे आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.
10 / 10
रोहित पवारांनी एका पुस्तकाचा हवाला देत कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करायचे असेल तर त्याच्या ड्रायव्हरला नुकसान पोहचवा, हा सोपा उपाय आहे असं सांगितले. रोहित यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र या अपघातावर त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी अनेक शंका उपस्थित होत आहेत.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटना