दादर स्थानकात लोकलला लागलेल्या आगीवर नियंत्रण, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 00:10 IST2018-02-03T00:04:47+5:302018-02-03T00:10:47+5:30

दादर स्थानकात ठाण्याला जाणा-या लोकलला आग लागल्याची घटना घडली आहे.

लोकलमधून धूर येत असल्यानं प्लॅटफॉर्म नंबर एक प्रवाशांसाठी बंद करण्यात आलं आहे.

दादर ते परेलदरम्यान ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेमुळे ठाणे आणि कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या लोकल गाड्या करी रोड, भायखळा या स्थानकांवरच थांबवण्यात आल्या होत्या.

मध्य रेल्वेवरच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवरची वाहतूक फ्लॅटफॉर्म नंबर 4 वर वळवण्यात आली होती.

मध्य रेल्वेनं आगीवर नियंत्रण मिळवलं असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.

दादर स्थानकावर लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं आहे.