पोलिसांचा आढावा, मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्याना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 03:19 PM2019-12-15T15:19:12+5:302019-12-15T15:25:50+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलिस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री एकनाथ शिंदेंचं मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी स्वागत केलं. त्यावेळी, मानवंदनाही देण्यात आली.

या बैठकीत मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन मुंबईकरांच्या सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

गृहमंत्री म्हणून पोलीस खात्याचा पदभार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्यामुळे शिंदे यांचे पोलिस अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले

आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाची पाहणी करून मुंबईच्या सुरक्षेची खातरजमा केली.

24 तास कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षातील CCTV यंत्रणा, ड्रोनचा वापर याबाबत माहिती घेतल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नजर ठेवण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.