'भ्रष्टाचाराचा कोविड' म्हणत भाजपाचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Published: March 4, 2021 06:32 PM | Updated: March 4, 2021 07:05 PM
कोरोनाच्या नावाखाली राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. निविदा न मागविताच कोविडचे कोट्यवधीचे साहित्य खरेदी करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा आमदारांनी केला. तसेच, ठाकरे सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन केले.