By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:30 IST
1 / 4गॅस सिलिंडर टंचाईने सर्वसामान्य हतबल - आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची फरपट होत असताना याचा लाभसायबर भामटे घेत आहे. गॅस अपडेटच्या नावाने बँक खाते रिकामे करण्याचे काम सुरु आहे.2 / 4अशी होतेय लूट - तुम्हाला सिलिंडर हवे आहे का, गॅस कनेक्शन अपडेट करायचे असून ते केले नाही तर तुमचे कनेक्शन बंद होईल, असा फोन अनोळखी नंबरवरून येतो अन् ओटीपी मागितला जातो. आपल्या मोबाइलवर आलेला ओटीपी देतात सायबर भामटे आपले बैंक खाते रिकामे करतात.3 / 4कधी आरटीओ चालान, तर कधी वीजबिलाची एपीके - १) वीज कंपन्यांच्या नावे 'वीजबिल भरा अन्यथा आजच रात्री कनेक्शन तोडण्यात येईल,' असा संदेश देऊन ग्राहकांना लुटण्याचा नवा प्रकार सायबर चोरांनी वापरायला सुरुवात केली. त्यानंतर आरटीओ चालान भरायचे आहे. २) तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा किंवा तुमच्या मोबाइलवर आलेला आलेल्या लिंकवर क्लिक करा, असे सांगून ग्राहकांना लाखो रुपयांना गंडा घातला जात असताना आता गॅस अपडेटच्या नावाने बँक खाते साफ केले जात आहे.4 / 4लिंकवर क्लिक करताच बँक खाते साफ - अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने फिशिंग किंवा व्हायरसद्वारे हॅकर्स मोबाइलचा ताबा घेऊन बँक खाते रिकामे करताता. हे टाळण्यासाठी कोणत्याही संशयास्पद, 'केवायसी अपडेट' किंवा 'लॉटरी'च्या लिंकवर क्लिक करू नका. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या नंबरवर तक्रार करा.