By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:48 IST
1 / 8Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात बारामती येथे झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. विमानाचा अपघात की घातपात यावरुन आता संशय उपस्थित केले जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विमान कंपनीवर आरोप केले असून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.2 / 8पवार कुटुंबातून आतापर्यंत फक्त रोहित पवार एकटेच संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी करत होते. दरम्यान, आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांनीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. 3 / 8युगेंद्र पवार यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी २८ जानेवारी दिवशीची आठवण सांगितली. युगेंद्र पवार यांनीही आता अजितदादांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे.4 / 8'मला २८ जानेवारीला सकाळी ८:५५ वाजता फोन आला की दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे. मला सुरुवातीला वाटले की कदाचित रनवेवरून विमान घसरले असेल किंवा साधे क्रॅश लँडिंग झाले असेल. पण जेव्हा मी तातडीने बारामती विमानतळावर पोहोचलो, तेव्हा चित्र भयावह होते',असेही युगेंद्र पवार म्हणाले.5 / 8विमान ५० फूट खाली कोसळले होते आणि पूर्णपणे खाक झाले होते. विमानाचा फक्त मागचा भाग दिसत होता, बाकी सर्व काही जळून खाक झाले होते, असे युगेंद्र पवार म्हणाले. युगेंद्र पवार यांनीही अजित पवारांच्या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. अजित दादांचा विमान अपघात ही दुर्घटना नसून घातपात आहे, अशी शक्यता युगेंद्र पवार यांनी वर्तवली.6 / 8आज आमदार रोहित पवार बारामती येथील पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहेत. यावेळी युगेंद्र पवारही उपस्थित आहेत. घात झाल्याची शंका रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. त्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.7 / 8दरम्यान, अजित पवार यांचा ज्या विमानामुळे अपघात झाला, त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. आधी ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. क बॉक्स सुस्थितीत असल्याबाबतची नोंद बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली आहे.8 / 8दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सापडलेला 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित अवस्थेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे AIB चे अधिकारी के. रामचंद्र यांनी या ब्लॅक बॉक्सची पाहणी करून तो सुरक्षित असल्याची नोंद केली होती.