शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही घरून काम करता? तासंतास बेडवर बसून काम करणं पडू शकतं महागात, कसे ते वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 5:43 PM

1 / 10
सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांना घरून काम करावं लागत आहे. घरून काम करणं सुरुवातीचे काही दिवसं चांगलं वाटत असलं तरी सतत एकाच ठिकाणी बसून तुम्ही अनेक दिवस काम करत असाल तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. कारण त्यामुळे तुमच्या आरोग्याचं नुकसान होत असतं.
2 / 10
घरी नक्कीच ऑफिससारखं वातावरण नसतं. त्यामुळे अनेकजण टेबल, खुर्ची किंवा गादीवर काम करायला बसतात. तर काहीजण आपल्या मांडीवर लॅपटॉप ठेवतात. त्यामुळे नकळतपणे आरोग्यावर परिणाम होतो. तसंच झोपेशी निगडीत आजार सुद्धा तुम्हाला होऊ शकता.त.
3 / 10
सलग ४-५ तास एका स्थितीत बसून काम केल्यामुळे तुमची कंबर आणि मान दुखू शकते. तसंच पाठीच्या कण्याला सुद्धा त्रास होऊ शकतो. त्याासाठी उपाय म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं गरजेंचं आहे.
4 / 10
सतत खाली बघावं लागणार नाही लॅपटॉप इतक्या उंचीवर ठेवा.
5 / 10
काम करण्यासाठी तुम्ही टेबलचा वापर करू शकतात
6 / 10
बसताना पाठीला आधार म्हणून उशी मागे ठेवा.
7 / 10
काम करत असताना हाता पायांची स्ट्रेचिंग करा.
8 / 10
काम करताना चहा किंवा कॉफी सतत पिणं टाळा. त्याऐवजी जास्तीत जास्त पाणी प्या.
9 / 10
पाय सरळ ठेऊन बसा किंवा गुडघ्यांपासून मोडून बसा. बराचवेळ एकाच स्थितीत बसू नका.
10 / 10
वेळ मिळाल्यास योगा किंवा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुमचं शरीर चांगलं राहिल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स