शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shivjayanti Kolhapur- कोल्हापुरात वेगवेगळ्या मार्गाने शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 1:16 PM

1 / 5
शिवाजी पेठेत मोहीम फत्तेचे सादरीकरण शिवाजी तरुण मंडळने यंदा शिवजयंतीनिमित्त उभा मारुती चौकात शिवाजी महाराज मोहीम फत्ते करून आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी उजळून गेलेला गड अशी ४५ फूट बाय ६० फूट अशी प्रतिकृती बुधवारी सायंकाळी सर्वांसाठी खुली केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
2 / 5
चक्क स्कूटरवर अवतरली शिवशाही कोल्हापुरातील यादवनगरात राहणारे शिवभक्त राजू पाटील यांनी आपल्या जुन्या स्कूटरवर शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांचा छोटा पुतळा, गडकिल्ल्यांची प्रतिकृती, जिजाऊ, शिवराय आणि बाल संभाजी, अशी चित्रे रंगवली आहेत. त्यांची ही स्कूटर बालचमूसह थोरमोठ्यांचे आकर्षण ठरत आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
3 / 5
तेहतीस हजार रुद्राक्षांपासून साकारली शिवप्रतिमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अतुल माने यांच्या संकल्पनेतून व चेतन राऊत (मुंबई ) यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ हजार रुद्राक्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली. तिचे अनावरण मधुरिमाराजे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
4 / 5

5 / 5
आग्र्याहून सुटका महानाट्य सादर कोल्हापुरातील मिरजकर तिकटी परिसरातील मावळा ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त बुधवारी सायंकाळी विनोद साळोखेलिखित, दिग्दर्शित आग्र्याहून सुटका या महानाट्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. हे महानाट्य सलग तीन दिवस या ठिकाणी सादर केले जाणार आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर