कोल्हापुरात सकल मराठा मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 15:40 IST2018-11-26T15:36:54+5:302018-11-26T15:40:34+5:30

कोल्हापुरात सकल मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.(सर्व छायाचित्र - आदित्य वेल्हाळ)
या मोर्चाच्या निमित्तानं शिरोली येथेही मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पुणे-बंगलोर महामार्गजवळ शिरोली येथे तसेच कोल्हापूर शहरातील टोलनाकाजवळ मराठा पोलिसांकडून मोर्चा रोखण्यात आला.
कोल्हापूरमधून मुंबईकडे कार्यकर्ते रवाना होऊ नयेत म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोर्चेकरांचीही संख्या अधिक असल्यानं पोलीस आणि मोर्च करणारे आमने-सामने आले आहेत.
मोर्चा अडवून सरकारने मराठ्यांची गळचेपी केली आहे, असा आरोप करत शंखध्वनी करून मुख्यमंत्री, पालकमंत्री , पोलीस अधीक्षक यांचा सकल मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला.