शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नियमांची ऐशीतैशी ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:36 PM

1 / 3
कोल्हापुरातील स्टेशन रोडवर वाहनांची वर्दळ मोठी असते. त्यामुळे रस्ते ओलांडताना अनेकदा अपघात होतात. ही बाब ध्यानात घेऊन महापालिकेने दाभोळकर कॉर्नरनजीक थेट मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर हॉटेल सह्याद्रीच्या मागे पादचारी पूल बांधला. त्यामुळे थेट रस्ता दुभाजक ओलांडून नागरिक इकडून तिकडे जाणार नाहीत, अशी अपेक्षा होती; परंतु वेळ व श्रम वाचविण्याच्या नादात बहुतांश नागरिक या पुलाचा वापर न करता थेट धोकादायकरीत्या दुभाजकावर चढून रस्ता ओलांडतात.
2 / 3
कोल्हापुरातील सुभाष रोडवरील फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज या मार्गावरही पादचाºयांना रस्ता ओलांडणे सोपे जावे याकरिता दुभाजकांमधून काही अंशी जागा सोडली आहे. या जागेचा वापर पादचाºयांऐवजी वाहनधारकच अधिक करतात. दुपारी असाच एक वाहनधारक नियमांची ऐशीतैशी करतानाचे छायाचित्र.छाया : दीपक जाधव
3 / 3
पार्वती टॉकीज चौकातील सिग्नल सुरू असताना चक्क वाहनधारक असे झेब्रा क्रॉसिंगवर अस्ताव्यस्त उभारल्याचे चित्र दुपारी पाहण्यास मिळाले. वाहनधारकांकडून असे वर्तन नेहमीचेच घडत असल्याचे चित्र कोल्हापुरातील सर्व सिग्नलवर कमी-अधिक प्रमाणात पाहण्यास मिळते. छाया : दीपक जाधव